Friday, November 8, 2024

/

चला अंदमानला,सावरकरांना वंदन करुया

 belgaum

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वा. सावरकर यांची अंदमनातून मुक्तता होऊन यंदा १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सावरकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून सावरकर प्रेमी आणि हिंदुत्ववादी अंदमान ला दाखल होत आहेत. संपूर्ण प्रवासात सावरकर विचारांचा जागर करत करत आपल्या नसा नसात हिंदुत्वाची पाळेमुळे अधिक बळकट करण्याची ही सहल मुख्य संधी आहे.

यामुळेच बेळगावात मुख्यालय असलेल्या पृथ्वीराज टूर्स ने अंदमान भेटीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य तपशील व काही वैशिष्ट्ये सोबत देत आहोत.
१. स्वा. सावरकरांना अभिवादन करण्यासाठी वंदे मातरम्, जयोस्तुते, आणि ने मजसी ने या गाण्यांचे गायन व सावरकरांची मुक्तता होऊन १०० वर्ष झाली या निमित्ताने १०० ज्योती प्रज्वलित करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल.

२. सावरकरांच्या कोठडीसमोर उभे राहून या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी.

३. अंदमान प्रवासात संपूर्णपणे ३ स्टार हॉटेलमध्ये निवास व्यवस्था असेल.

४. नाश्ता, चहा, आणि उत्तम दर्जाचे शुद्ध शाकाहारी जेवण अशी परिपूर्ण व्यवस्था या प्रवासात असेल.

५. अंदमानात स्थळदर्शन करतांना प्रत्येक वेळी एसी गाडीचा प्रवास असेल.

६. या विशेष सहलीत मुख्य आकर्षण म्हणजे अंदमानातील प्राणी आणि पक्षी यांच्याशी संवाद साधणाऱ्या त्यांच्याशी बोलणाऱ्या श्रीमती अनुराधा राव यांच्या तोंडून सावरकरांचे आजवर कधीही न ऐकलेले अनुभव ऐकता येतील.

७. सहलीत दररोज सावरकरांच्या जीवनावरील विविध पैलू उलगडणारी माहिती देण्यात येईल.

८. पोर्टब्लेअर शहर, रॉस बेट, नील बेट, हॅवलॉक बेट या विविध स्थळांना भेटी देण्यात येतील. नील व हॅवलोक येथे मुक्काम असेल, येथील समुद्रकिनारे जगभर प्रसिद्ध आहेत, आशिया खंडातील क्रमांक २ वर असणाऱ्या राधानगरी बीचवर संपूर्ण दिवस घालवता येईल.

Veer savarkar
Veer savarkar

९. लाईमस्टोन लेणी या खाऱ्या पाण्यापासून बनलेल्या गुफा आणि सोबतच जारव्हा नावाचे दुर्मिळ आदिवासी प्रजाती हे दोन्ही बघण्याची सुवर्णसंधी या सहलीत आम्ही उपलब्ध करून देत आहोत. सोबत मॅनगृव्ह फॉरेस्टला भेट देण्यात येईल.

१०. संपूर्ण दिवसभरात अंदमानात स्वा. सावरकरांनी जो त्याग केला, जे कष्ट भोगले त्याची माहीत नसलेली कहाणी ऐकत ऐकत अंदमानातील सर्वोत्तम आणि जगप्रसिद्ध स्थळांना भेटी देण्यासाठी विशेष आयोजन म्हणजे “चला अंदमानला,सावरकरांना वंदन करुया” ही विशेष सहल.

११. या प्रवासादरम्यान ६ तासांचा अविस्मरणीय जहाज प्रवास करायचा आहे तोही काळ्या पाण्याच्या समुद्रातून.

१२. सावरकरांच्या मुक्ततेनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी ही सहल आहे, त्यामुळे निवडक सावरकरप्रेमीना सहभागी करून घेण्यात येईल. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे तातडीने नोंदणी करा.
*ही सहल पाच दिवस आणि सहा रात्रिंची असेल. सप्टेंबर,ऑक्टोबर,नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात आपण आपली नोंदणी करू शकता.
मित्रहो,
ज्या सावरकरांनी अंदमानात ५० वर्ष शिक्षा भोगण्याच्या इराद्याने पाऊल ठेवले, हाल सोसले त्यांना वंदन करण्यासाठी एकदा तरी अंदमानला जायलाच हवे. आपल्या प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे. आपण आपल्या परिचितांना या सहलीत सामील करा, तरुणांपर्यंत हा सावरकर विचार नेण्यासाठी ही माहिती आपल्या परिचितांना नक्की शेअर करा.

आपला,
प्रसाद सु.प्रभू
संचालक पृथ्वीराज टूर्स
बुकिंगसाठी सम्पर्क –
8073324496
9686084656
8073958643

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.