अवजड वाहनाच्या धडकेत गेल्या चार दिवसांत दोन बळी गेल्यावर जागे झालेल्या प्रशासनाने बेळगाव शहरात स्पीड ब्रेकर घालायला सुरुवात केली आहे. संचयनी सर्कल ते ग्लोब सिनेमागृहा पर्यंत रस्त्यावर एका बाजूला तीन स्पीड ब्रेकर घालण्यात आले आहेत. परिणामी गुरुवारी दुपारनंतर या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली असून ग्लोब ते व्हाया कॅम्प अशी वाहतूक वळविण्यात आली होती.
बेळगाव फिश मार्केट लगतच्या पेट्रोल पंपजवळ ट्रकच्या धडकेत एका दहा वर्षीय बालकाचा जीव गेला होता. त्यानंतर या भागातील लोकांनी जोरदार निदर्शने करत आंदोलन छेडले होते. इतकेच काय तर कॅम्प भागातील विविध शाळातील पालकांनी रहदारी विभागाच्या डी सी पी यांच्याशी चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. शहरात रहदारीचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली.लागले स्पीड ब्रेकर
अवजड वाहनाच्या धडकेत गेल्या चार दिवसांत दोन बळी गेल्यावर जागे झालेल्या प्रशासनाने बेळगाव शहरात स्पीड ब्रेकर घालायला सुरुवात केली आहे. संचयनी सर्कल ते ग्लोब सिनेमा गृहा पर्यंत रस्त्यावर एका बाजूला तीन स्पीड ब्रेकर घालण्यात आले आहेत परिणामी गुरुवारी दुपारी नंतर या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली असून ग्लोब ते व्हाया कॅम्प अशी वाहतूक डायव्हर्ट करण्यात आली होती.
बेळगाव फिश मार्केट लगतच्या पेट्रोल पंपा जवळ ट्रकच्या धडकेत एका दहा वर्षीय बालकाचा जीव गेला होता त्या नंतर या भागातील लोकांनी जोरदार निदर्शन करत आंदोलन केलं होते इतकेच काय तर कॅम्प भागातील विविध शाळातील पालकांनी रहदारी विभागाच्या डी सी पी यांच्याशी बैठक करत शहरात रहदारीचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली होती तया नंतर पोलीस प्रशासन शिक्षण खाते आणि पालक वर्गाची बैठक देखील झाली होती.
डी सी पी स्नेहा पी व्ही यांनी या भागात दोन रहदारी पोलीस नियुक्त केले जातील या शिवाय सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ते ६ या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्याचे सुतोवाच्य केले होते. कॅम्प भागातील अनेक शाळा मधून दररोज १८ हजार शाळकरी मुले प्रवास करत असतात यासाठी पोलिसांनी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी वाढली होती त्यानुसार पोलिसांनी या रस्त्यावर गुरुवारी स्पीड ब्रेकर घालण्याचे काम सुरु केले आहे.
केवळ कॅम्प नव्हे तर शहरातील अनेक शाळा कॉलेज असलेल्या ठिकाणी सर्वे करून सर्वच रस्त्यावर स्पीड ब्रेकर घालायला हवे अशीही मागणी यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.लागले स्पीड ब्रेकर
अवजड वाहनाच्या धडकेत गेल्या चार दिवसांत दोन बळी गेल्यावर जागे झालेल्या प्रशासनाने बेळगाव शहरात स्पीड ब्रेकर घालायला सुरुवात केली आहे. संचयनी सर्कल ते ग्लोब सिनेमा गृहा पर्यंत रस्त्यावर एका बाजूला तीन स्पीड ब्रेकर घालण्यात आले आहेत परिणामी गुरुवारी दुपारी नंतर या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली असून ग्लोब ते व्हाया कॅम्प अशी वाहतूक डायव्हर्ट करण्यात आली होती.
बेळगाव फिश मार्केट लगतच्या पेट्रोल पंपा जवळ ट्रकच्या धडकेत एका दहा वर्षीय बालकाचा जीव गेला होता त्या नंतर या भागातील लोकांनी जोरदार निदर्शन करत आंदोलन केलं होते इतकेच काय तर कॅम्प भागातील विविध शाळातील पालकांनी रहदारी विभागाच्या डी सी पी यांच्याशी बैठक करत शहरात रहदारीचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासन, शिक्षण खाते आणि पालक वर्गाची बैठक देखील झाली होती.
बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये सेंट पॉल, सेंट जोसेफ, सेंट मेरीज, सेंट झेवियर्स, सेंट अँथनी, इस्लामिया, कॅन्टोन्मेंट स्कूल, बी.के. मॉडेल, जिजामाता स्कूल आणि केंद्रीय विद्यालय, मराठी विद्यानिकेतन, ज्योती सेंट्रल यांसारख्या बेळगावच्या काही जुन्या आणि मोठ्या शाळा आहेत. सुमारे 18,000 विद्यार्थ्यांना दररोज सकाळी लवकर शाळेत जावे लागते, त्यामुळे हा महत्वपूर्ण रस्ता आहे.
या बैठकीत डी सी पी स्नेहा पी व्ही यांनी या भागात दोन रहदारी पोलीस नियुक्त केले जातील, या शिवाय सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्याचे सुतोवाच्य केले होते. कॅम्प भागातील अनेक शाळांमधून दररोज १८ हजार शाळकरी मुले प्रवास करत असतात. यासाठी पोलिस आणि प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी वाढली होती. त्यानुसार पोलिसांनी या रस्त्यावर गुरुवारी स्पीड ब्रेकर घालण्याचे काम सुरु केले आहे.
केवळ कॅम्प नव्हे तर शहरातील अनेक शाळा कॉलेज असलेल्या ठिकाणी सर्वे करून सर्वच रस्त्यावर स्पीड ब्रेकर घालायला हवे अशीही मागणी यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.