Friday, March 29, 2024

/

सरकारच्या दत्तक योजनेत भूतनाथ मंदिर, राजहंस गड किल्ला

 belgaum

 

कर्नाटक सरकारतर्फे ऐतिहासिक वास्तू वारसा स्थळांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास व देखभाली संदर्भात महत्त्वाकांक्षी वारसा स्थळे दत्तक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत बेळगावातील भूतनाथ मंदिर व राजहंसगड किल्ल्यासह जिल्ह्यातील चार आणि संपूर्ण राज्यातील 30 ठिकाणांचा समावेश आहे.

राज्य सरकारकडून वारसा स्थळांवरील पर्यटन सुविधा, देखभाल करणे आणि पर्यटकांसाठी अनुकूलता वाढवणे तसेच पर्यटन क्षमतेसह सांस्कृतिक विकास टप्प्याटप्प्याने केला जाणारा आहे. यासाठी सरकारने पहिल्यांदा वारसा स्थळांसाठी दत्तक योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 30 ठिकाणी निवडण्यात आली असून त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीचा पारसगड, बेळगाव तालुक्यातील कणबर्गी येथील भूतनाथ मंदिर व येळ्ळूरचा राजहंसगड किल्ला आणि कित्तूर येथील राणी चन्नम्मा यांच्या किल्ल्याचा समावेश आहे. राज्यातील संबंधित ठिकाणच्या विविध विकास योजना कामे व नियोजनाची माहिती देणगीदारांना देऊन त्यांच्या नावे विकास योजना राबविली जाणार आहे. ऐतिहासिक स्थळांचा विकास शासनाच्या निधीद्वारे होणार आहे. त्यासोबत जनतेचा निधीही मिळणार असल्यामुळे विकास अधिक व्यापक आणि चांगल्या स्वरूपाचा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 belgaum

पुरातत्व इमारत संरक्षण आणि विकासासाठी ‘ॲडाॅप्ट ए मॅन्यूमेंट’ अर्थात वारसा दत्तक स्थळे योजना घोषित करण्यात आली असून त्या अंतर्गत स्मारके, नैसर्गिक वारसा स्थळे इतर पर्यटन स्थळे दत्तक घेण्यासाठी खाजगी, सार्वजनिक कंपन्या, संस्था व इतर व्यक्तींचे सहकार्य घेण्याची कल्पना आहे.

राज्य पुरातत्व विभागाने यासंदर्भात अहवाल तयार करून यादी सादर केली आहे. त्यात संबंधित 30 वास्तू व वारसा स्थळांची माहिती आणि त्यांचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. ॲडाॅप्ट ए मॅन्यूमेंट योजनेद्वारे उपलब्ध निधीतून स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, स्वच्छ पाणीपुरवठा योजना, पर्यटकांसाठी सुलभ प्रवेश, दिशादर्शक फलक, रोषणाई व वायफाय आदी मूलभूत सुविधा करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.