Thursday, April 25, 2024

/

…आणि वेळेने ही साथ सोडली…

 belgaum

बेळगाव बागलकोट महामार्गावर निलजी जवळ गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एक गंभीर जखमी झाला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले होते. मात्र शनिवारी सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुभाष कल्लाप्पा बेडका यांचा मृत्यू झाला आहे.

बसवन कुडची हुन सांबऱ्याकडे जाणारी दुचाकी निलजी येथे कुबेर धाब्याजवळ उजव्या बाजूला वळण घेत असताना बसने मागून दुचाकीला ठोकर दिली.गेल्या 60 हुन अधिक तासापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते त्याची मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली आहे.

त्यात एकजण बाजूला पडला तर एक जण बसच्या चाका खाली आला. मात्र बस चालकाने शर्तीचे प्रयत्न करून वेळेत बस नियंत्रणात आणली यामुळे दोघीही बचावले होते.Subhasha bedka

 belgaum

सदर घटनेत एकजण एक जण किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी झाला होता. या दोन्ही भावंडांनी अनुभवलेला मृत्यूचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आला होता.

मात्र त्यातील गंभीर जखमी झालेले . शिवाजी गल्ली, बसवणं कुडची, येथील सुभाष कल्लाप्पा बेडका वय 43 त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी ,दोन मुलं आणि भाऊ आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.