माजी उपमुख्यमंत्री अपघातातून बचावले
विधान परिषदेचे सदस्य आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची कार पलटी झाली असून असून ते अपघातातून सुदैवाने बचावले आहेत या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी जवळ त्यांची कार पलटी झाल्याने हा अपघात घडला असून सवदी सुखरूप आहेत.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून स्थानिकांनी सवदी यांना इस्पितळात दाखल केले आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे.