Friday, March 29, 2024

/

गोल्फ कोर्स जंगलात बिबट्याचा वावर या शाळांना सुट्टी

 belgaum

गोल्फ कोर्स मैदान जंगल परिसरात बिबट्याचा वावर ट्रॅप कॅमेरा कैद झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गोल्फ कोर्स परिसरातील एक किलोमीटर परिघातील मधील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान ट्रॅप कॅमेरा बिबट्याची छायाचित्रे आल्यानंतर वन खात्याने शोध मोहीमेचा केंद्रबिंदू  गोल्फ कोर्स जंगल केला आहे.

गोल्फ कोर्स जंगलातील बिबट्याच्या वावराने केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 आणि वनिता विद्यालय,मराठी विद्यानिकेतन,एन पी ई टी क्लब रोड के एल ई इंटरनॅशनल स्कुल कुवेम्पू नगर,सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्या नगर,सरकारी मराठी शाळा सदाशिवनगर यासह हनुमान नगर,सह्याद्री नगर ,कुवेम्पू नगर आणि सदाशिवनगर कन्नड प्रथिमक,सेंट झेवियर्स स्कुल, दूरदर्शन नगर कन्नड प्राथमिक शाळा आणि हिंडलगा ग्राम पंचायतीतील शाळांना अशा शाळांना सोमवारी सुट्टी देण्याचा आदेश शहर गट शिक्षणाधिकारी बजंत्री यांनी बजावला आहे.

 belgaum

वन खात्याने रविवारी सात ट्रॅप कॅमेरे आणि सात पिंजऱ्या सह कोंबिंग ऑपरेशन करत बिबट्याला जेरबंद करण्याची पूर्ण तयारी केली आहे. कोणत्याही क्षणी बिबट्या जेरबंद करण्याची शक्यता आहे अशी माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे.Golf course

पोलीस विभागाने रेसकोर्स आणि गोल्फ कोर्सच्या आजूबाजूच्या भागात विशेषत: जाधव नगर, हनुमान नगर, आणि जलतरण तलाव आणि आतापर्यंत बिबट्या दिसलेल्या ठिकाणी जारी केलेला अलर्ट पुढे ठेवला आहे

पोलिसांनी हनुमान नगर, जाधव नगर आणि आजूबाजूच्या परिसरांना बिबट्याच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे, स्थानिक रहिवाशांना विशेषत: अंधारात आणि पहाटेच्या वेळी विनाकारण फिरू नये असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.