गांजा विक्री प्रकरणी दोन युवकांना अटक-कॅम्प पोलिसांची कारवाई
गांजा विक्री प्रकरणी सोमवारी कॅम्प पोलिसांनी कारवाई केली आहे.गांजा विक्री करणाऱ्यांवर धाड टाकत दोघांना अटक केली आहे.
कॅम्प पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सदर कारवाई केली आहे. कॉलेज रोड येथील खैबर हॉटेल नजीक सदर कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकांकडून गांजा व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप हुबळी वय 27 रा. जेड गल्ली शहापूर व विजयकुमार तांडूर, वय 25 रा गुळदगुड, बागलकोट, सध्या जेड गल्ली शहापूर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या दोघांकडून 27 हजार 424 रुपये किमतीचा 1किलो 705 ग्रॅम गांजा, मोबाइल आणि दुचाकी असे मिळून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.