Sunday, June 16, 2024

/

जिवंत हृदयासाठी ‘ग्रीन कॉरिडोर’ची व्यवस्था

 belgaum

धारवाड एसडीएम येथून बेळगावच्या केएलई हॉस्पिटलपर्यंत जिवंत हृदयाची वाहतूक करण्यासाठी पोलिसांनी धारवाड ते बेळगाव ग्रीन कॉरिडोरची(झिरो ट्रॅफिक) व्यवस्था केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली.

धारवाड एसडीएम येथे दात्याकडून हृदय ताब्यात घेतल्यानंतर आज सोमवारी दुपारी ते रस्ते मार्गे धारवाडहून रवाना करण्यात आले ज्याचे सायंकाळी 4 वाजता बेळगावात आगमन झाले.Green coridor heart

डॉक्टरांनी मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याचे घोषित केलेल्या एका महिलेच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्या अवयवांपैकी महिलेचे हृदय बेळगावच्या केएलई हॉस्पिटलकडे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.

 belgaum

सदर जिवंत हृदय द्रुतगतीने वेळेत केएलईमध्ये पोहोचावे यासाठी पोलिसांनी धारवाड ते बेळगाव ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.