Thursday, May 2, 2024

/

अभियंत्याकडून नॅशनल लेव्हल वेटलिफ्टरला मदत

 belgaum

बेळगाव येथील लिओ इंजीनियर्सचे संचालक अभियंते जयदीप बिरजे यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धातून यश मिळवलेल्या खेळाडूस आर्थिक मदत केली आहे.खेलो इंडिया मध्ये तीन गोल्ड मेडल मिळवलेली बेळगावच्या अक्षता कामती हिला मदत करत एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे.

खेलो इंडिया खेलो मध्ये तीन वेळा प्रथम येऊन वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक सुयश मिळवलेल्या अक्षता कामती हिचा मराठा निर्माण जागृती संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी गोपाळराव बिर्जे यांच्या हस्ते अक्षता कामती हिला 31 हजाराची रोख रक्कम मदत स्वरूपात देण्यात आली.लिओ इंजिनिअर्सचे अभियंता जयदीप बिर्जे यांच्या तर्फे सदर रक्कम तिला देण्यात आली.

अक्षता हिचे वडील शेतकरी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात तिचे कौतुक केले होते मध्यमवर्गीय कुटुंबातील या खेळाडूला सध्या आर्थिक मदतीची गरज आहे त्यासाठी जयदीप यांनी तिला 31 हजारांची आर्थिक मदत देऊ केली आहे.Akshta

 belgaum

यावेळी नेताजी जाधव,दिपक पाटील, सुभाष पाटील, गजानन सप्रे, तुकाराम वडगावकर, वनिता बिर्जे, नलिनी पाटील, अक्षराचे वडील बसवंत कामती आणि उपस्थित होते यावेळी नेताजी नारायण जाधव प्रतिष्ठान तर्फे नेताजी जाधव यांनी पाच हजार रुपये तर नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने पाच हजार रुपयांची मदत अक्षता कामती हिला दिली.

यावेळी गोपाळराव बिर्जे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये अक्षता कामती हिच्या बद्दल गौरवद्गार काढले होते. अशा हरहुन्नरी क्रीडापटूला आर्थिक मदतीची गरज आहे. तिच्या वडिलांचा अपघात झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली आहे. यामुळे तिला प्रति महिना पोषण आहार व सरावासाठी लागणारा खर्च करणे देखील कठीण आहे याकरिता तिला आर्थिक मदतीची गरज असल्याचे गोपाळराव बिर्जे यांनी सांगितले. दानशूर व्यक्तींनी तिला मदत करावी असे आवाहन देखील केले.

मदतीसाठी…
सुवर्णपदक विजेत्या अक्षता कामती हिला मदत करण्यासाठी बँक ऑफ इंडीयाच्या अक्षता कामती यांच्या खात्यावर जमा करावी.

बँक खाते क्रमांक – 41113818162
SBIN0016401

7411902676
PhonePay goolepay number

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.