बेळगाव जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा पाय पसरवण्यास सुरुवात केली असून काल रविवारी नव्याने 11 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 वर पोचली आहे.
आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी बेळगाव व गोकाक तालुक्यातील प्रत्येकी 3, सौंदत्ती तालुक्यात 2, बैलहोंगल तालुक्यात 2, अथणी तालुक्यात 1 अशा एकूण 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपचारांती कोरोना मुक्त झाल्यामुळे काल तिघा जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, अद्याप 826 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
आत्तापर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 20 लाख 77 हजार 462 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 19 लाख 71 हजार 55 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे बाधितांची एकूण संख्या 1 लाख 218 इतकी झाली आहे.