बेळगावातल वातावरण आज मान्सूनच्या आगमनामुळे कुंद होऊन गेलंय, भरलेलं आभाळ काळाकुट्ट झालेला परिसर आणि एक प्रकारची मंद मंद सोड पसरलेले हवा त्यामुळे मानसून सूचक आगमन दिसून येत होते.
मान्सून खात्याच्या अंदाजानुसार आगामी 48 तासांमध्ये महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे तर पुढील 24 तासांमध्ये उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये आणि बेळगावात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे एक दिवस अगोदरच बेळगावातल्या वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला होता.
शेतकऱ्यानी मशागत करून जमिनी तयार केलेल्या आहेत काही जणांनी धूळ वाफ तर काहींनी वळीव पावसाच्या वर पेरण्या केलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे शेतकरी माणसांच्या बाबतीत आशादायक आहे दर वेळी येणाऱ्या मान्सून नेहमी बेळगावकरांसाठी सुखकारक आणि आनंद देणारा असतो या वेळीही पाऊस हवामान खात्याने वर्तवल्या प्रमाणे 102 टक्के पडेल असा अंदाज आहे.
वातावरण त्यापद्धतीने बनत चाललेल आहे पाऊस नियमित वेळेवर आणि बेळगावकरांना कधीही धोका न देणारा पाऊस येईल अशी आशा शेतकऱ्यांच्या कडून व्यक्त होत आहे. परत एकदा भूमी सगळ्या नवलाई ना भरून येईल,सगळं हिरवा गार होईल सर्जनशीलतेचा आविष्कार यासाठी बेळगाव परिसर सज्ज झाला आहे.