Friday, April 26, 2024

/

मयताच्या परिवाराला मिळवून दिली मदत

 belgaum

वळीवाच्या पावसाने क्लब रोड बेळगाव येथे झाड अंगावर कोसळून मयत झालेल्याच्या वारसांना राज्य सरकार कडून पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. आमदार अनिल बेनके यांनी ही मदत मिळवून दिली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी विजय कोल्हापुरे यांचे या अपघातात निधन झाले होते त्याची दखल घेत उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत सुपुर्त करण्यात आली.

मयताच्या पत्नी रेणुका कोल्हापुरे आणि कुटुंबाला देण्यात आली आहे.यावेळी बेळगावचे तहसीलदार कुलकर्णी, राहुल कुडे,गजू मिसाळे, विक्रम किल्लेकर विकास माने रामा घाटगे सुरेश आवळे, लता कोटराज आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.