Sunday, September 8, 2024

/

सीमाभागात ‘शिवसेना’ म्हणून निवडणूक लढवू-संजय राऊत यांचे संकेत

 belgaum

सीमा भागांतील मराठी माणसाचा विस्कळीत पणामुळे केवळ बेळगावच नव्हे तर सांगली सातारा कोल्हापूर मध्येही अडचणी निर्माण होत आहेत यासाठी आगामी काळात कोणतीही निवडणूक सीमा भागात शिवसेना म्हणून लढवू असे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत.

कोल्हापूर मुक्कामी ते पत्रकारांशी बोलताना बेळगावबाबत विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते.

गेल्या दोन दिवसांपासून राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांना बेळगावच्या मराठी माणसाचे एक शिष्टमंडळ भेटले होते त्यांना एकीकरण समितीतील दुही बाबत त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.Sanjay raut

एकीकरण समितीच्या फुटीमुळे सीमाभागातील मराठी माणसाची एकजूट धोक्यात आली आहे त्याचा फटका  केवळ बेळगावचं नव्हे तर सोबत सीमेवरील भागांत देखील बसत आहेत त्यामुळे आगामी काळात सीमाभागात शिवसेना म्हणून निवडणूक लढवू असे संकेत त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे नेहमी बेळगाव प्रश्नी आक्रमक असतात त्यांनी असा आदेश दिला असून लवकरच आपण बेळगावचा दौरा करणार आहोत असे सांगत कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर सारखा नेता संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करत शिवसेना बळकट करू असेही त्यांनी म्हटले आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.