पुन्हा एकदा बेळगांव उद्यमबाग औद्योगिक परिसरात वीजनिर्मिती करणारी यंत्रणा दुरुस्तीसाठी आली आहे.वाफेवर चालणारी आणि विज निर्मिती करणारी मशीन (यंत्र) उद्यमबाग औद्योगिक परिसरात पुन्हा एकदा दुरुस्ती साठी आली आहे.
३००० के डब्लू प्रती तास वीज तयार करणारी मशीन बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रात पुन्हा ऐकदा आली आहे. याआधी दुरुस्तीची कामे बेंगळूर, चैन्नई, मुंबई, दिल्ली, पुणे येथे होत असत. पण लियो इंजिनिअर्स, बेळगाव या कंपनीने ही मशीन बेळगाव येथे दुरुस्त करून महाराष्ट्र येथे पाठविण्याची जबाबदारी घेतली आहे.
या कामासाठी स्टीम टरबाइन वर दोन पेटंट्स असलेले Ex Skoda व GE Turbine मधे R&D Head सध्या लिओ इंजिनिअर्सचे डीझायनर Head उपेंद्रा प्रभु नाथ हे काम करणार आहेत.”हे टरबाईन दुरुस्त करण्यासाठी लिओ इंजिनिअर्सचे संचालक जयदिप बिर्जे यांनी पुणे येथील कंपनीबरोबर करार केला आहे.
३० दिवसात हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी लिओ कंपनीने घेतली आहे. याचा फायदा बेळगावच्या उद्यमबाग औद्योगिक क्षेत्रामध्ये व्हावा येथील एंजिनीरिंग युवकांना टर्बाइन पहाण्यास मिळावा, बेळगांव येथे टर्बाइन्सचे भाग तयार व्हावेत “लोकल फ़ॉर वोकल” “स्टार्टप” च्या संध्या उपलब्ध व्हावेत ही महत्त्वकांक्षा इंजिनिअर्सचे संचालक जयदिप बिर्जे यांना व्यक्त केली आहे.
हे काम पूर्ण करण्यासाठी अश्विन दड्डीकर(B.E Mech), निरंजन मुचंडी(M.tech, PhD), राहूल शिरोळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.