Thursday, April 25, 2024

/

‘गुरुवंदना’ जय्यत तयारी; शामियाना उभारणीला प्रारंभ

 belgaum

सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 15 मे रोजी मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यासाठी जय्यत तयारीसह भव्य शामियाना उभारण्याच्या कामाला आज शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे.

वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकासमोरील आदर्श विद्या मंदिर शाळेच्या मैदानावर सकल मराठा समाजातर्फे रविवारी भव्य अशा गुरुवंदना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव शहर परिसर आणि ग्रामीण भागासह संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे.Pendal guru vandna

कार्यक्रमाचे संयोजक किरण जाधव, रमाकांत कोंडुसकर व इतर युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवंदना कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी जोरदार पूर्वतयारी केली जात आहे.

 belgaum

ही तयारी पाहता कार्यक्रम स्थळासह संपूर्ण शहर रविवारी भगवेमय होणार हे निश्चित आहे. गुरुवंदना कार्यक्रम अवघ्या एक दिवसावर असल्यामुळे आदर्श विद्यामंदिरच्या प्रांगणात आज शुक्रवारपासून भव्य शामियाना उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.