बेळगाव विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाने (केएसआयएसएफ) आपल्या सुरक्षा व्यवस्थेत दोन स्निफर डॉग्सचा अर्थात दोन श्वानांचा अंतर्भाव केला आहे.
सांबरा येथील बेळगाव विमानतळाची सुरक्षाव्यवस्था कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाकडून हाताळली जाते. या दलाकडून सुरक्षाव्यवस्थेत अत्यंत प्रशिक्षित अशा या स्निफर डॉग्स अर्थात श्वानांचा समावेश करण्यात आला असून त्यांची नावे ‘तेजा’ आणि ‘भूमी’ अशी असल्याचे बेळगाव विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.
त्याचप्रमाणे ही दोन्ही श्वानं आरडीएक्स अंमली पदार्थ आदी घातक वस्तू शोधण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बेळगाव विमानतळ हा कडून ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार या विशेष श्वानांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार असल्या तरी या श्वानांचा दैनंदिन खर्च राज्य सरकार करणार आहे.