Friday, May 3, 2024

/

श्री चषक -2022′ : झियान स्पोर्ट्स अंतिम फेरीत

 belgaum

श्री स्पोर्ट्स, खडक गल्ली आयोजित ‘श्री चषक -2022’ अ. भा. निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना आज सोमवारी झियान स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी सरकार स्पोर्ट्स संघावर 3 गडी राखून विजय मिळविला. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना पावसामुळे अर्ध्यावर स्थगित करण्यात आला.

टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज सकाळी झियान स्पोर्ट्स आणि सरकार स्पोर्ट्स यांच्यात स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामना खेळवला गेला. यावेळी झियान स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना सरकार स्पोर्ट्स संघाने मर्यादित 10 षटकांत 7 गडी बाद 77 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल झियान स्पोर्ट्स संघाने 9.2 षटकांत 7 गडी बाद 79 धावा काढून 3 गड्यांनी विजय मिळवताना अंतिम फेरी गाठली.

त्यांच्या प्रथमेश पवार याने 5 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 34 धावा झळकविल्या. त्याला शाहीद एस. (16 धावा) याने उत्तम साथ दिली. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी झियानचा प्रथमेश पवार हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे कपिल भोसले, अर्जुनसिंग रजपूत, विजय जाधव, सुनिल बुलबुले, गिरीश धोंगडी व गजानन मिसाळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

 belgaum

स्पर्धेच्या दुसरा उपांत्य सामना विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि जी. जी. बॉईज यांच्यात दुपारी खेळायला गेला. या सामन्यात विघ्नहर्ता स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून जी. जी. बॉईज संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले.

जी. जी. बॉईजने 7.1 दोन षटकांत 4 गडी बाद 64 धावा काढल्या. त्यांचे मनोज नार्वेकर (नाबाद 34) आणि अनंत एम. (नाबाद 17) हे दोघे फलंदाजी करत असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नाईलाजाने सामना अर्ध्यावर स्थगित करण्यात आला. आता हा सामना उद्या मंगळवारी सलग पुढे चालू ठेवला जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.