सालाबादप्रमाणे शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यंदाचे “पत्रकार पुरस्कार -2022” जाहीर करण्यात आले असून येत्या रविवार दि. 17 एप्रिल सायंकाळी 5:30 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.
यंदा वाचनालयाच्या पत्रकार पुरस्काराकरिता मराठी विभागासाठी दै. तरुण भारत गोवा निवासीसंपादक सागर जावडेकर आणि कन्नड विभागासाठी न्युज हंट कन्नड चिकोडी वार्ताहर चंद्रशेखर एस चिनकेकरयांची निवड करण्यात आली आहे.
तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार 2022 साठी मराठी विभागात बेळगावचे साप्ताहिक सहकार दर्शनच्या व्यवस्थापकीय संपादिका वसुधा कानूरकर-सांबरेकर, कन्नड विभागात दैनिक प्रजावणी हुबळी ब्युरो चीफ रश्मी एस यांना जाहीर झाला आहे.
गणपत गल्ली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी हे पत्रकार पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
महिला मराठी विभागासाठी पुरस्कारासाठी निवड झालेल्या वसुधा कानुरकर सांबरेकर या बेळगाव live साठीही लेखन करत असतात.
असे होणार बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यावर्षी नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरवर्षी सार्वजनिक वाचनालयात अनेक दिग्गजांचे व्याख्यान आयोजन करण्यात येते मात्र
covid-19 च्या प्रादुर्भावा मुळे यंदाची व्याख्यान माला पुढे ढकलण्यात आली होती आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने आता व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यान मालेचे हे 47 वे वर्ष आहे आणि खालीलप्रमाणे वक्ते यात सहभागी होणार आहेत
रविवार 17 मार्च एप्रिल रोजी गोव्यातील लोककला स्वरूप आणि आविष्कार या विषयावर डॉ सतीश देशपांडेव्याख्यान देणार आहेत तर सोमवार 18 एप्रिल रोजी झी मराठी हास्य सम्राट सांगलीचे प्राध्यापक अजितकुमार कोष्टी यांचा हास्य कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार 19 एप्रिल रोजी ‘जीवन त्यांना कळले हो’ या विषयावर सातारा येथील माजी प्राचार्य यशवंत पाटणे हे व्याख्यान देणार आहेत त्या याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.