Saturday, April 27, 2024

/

या प्रकरणी समितीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता’

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेचे कचरा वाहू गाडी जाळल्या प्रकरणी सुळगा येथील पाच व उचगाव येथील एका अशा एकूण समितीच्या 6 कार्यकर्त्यांची सबळ पुराव्या अभावी माननीय चतुर्थ जे एम एफ सी बेळगाव न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की 6 ऑक्टोबर 2014 रोजी संध्याकाळी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महापालिकेची कचरा वाहून टिप्पर केए 22 -9126 ओला कचरा खाली करण्यासाठी जात असते वेळी सुळगा येथे टिप्परमधून ओला कचरा रस्त्यावर पडल्यामुळे संतप्त झालेल्या अज्ञात लोकांनी एकत्र येऊन कचऱ्याची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला होता त्या घटनेमध्ये गाडीचे 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले होते.Mes court

त्या प्रकरणी सदर टिप्पर चालकांने काकती पोलिसांत सहा ते सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करून काकती पोलीस उपनिरीक्षक यांनी कृष्णा गडकरी रा.उचगाव, मोहन पाटील अनिल कदम शिवाजी चौगुले मारुती पाटील आणि लक्ष्मण पाटील सर्वजण रा सूळगा(हिं) यांच्याविरुद्ध दोषारोपत्र दाखल केल होते यामध्ये गैर पणे दोघां पेक्षा अधिक लोक एकत्र येऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

 belgaum

सदर आरोपातून समितीच्या एकूण सहा कार्यकर्त्यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे समितीच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने वकील सुधीर चव्हाण यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.