Tuesday, May 28, 2024

/

या महिन्यात मालमत्ता करात 5 टक्के सूट पोचपावती न मिळाल्यास ‘हे’ करा

 belgaum

मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर लवकर भरण्यास प्रेरीत करण्याच्या उद्देशाने बेळगाव महापालिकेने ‘अर्ली बर्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जे नागरिक 2022 -23 सालचा मालमत्ता कर मागील कोणत्याही थकबाकी विना येत्या 30 एप्रिलपूर्वी भरतील त्यांना करामध्ये 5 टक्के सूट दिली जाणार आहे.

यंदा मालमत्ता करामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. तो मागील 2020 -21 साला प्रमाणेच असणार आहे. नागरिकांनी पेटीएम अथवा http://belagavicitycorp.org/  याठिकाणी भरावयाचा आहे. ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. http://belagavicitycorp.org/  या ठिकाणी जा (केवळ क्रेडिट /डेबिट /इंटरनेट /बँकिंगद्वारे पेमेंट) ऑनलाईन सर्व्हीसवर क्लिक करा.

पीआयडी एंटर करा आणि फॉर्म 1 मिळविण्यासाठी सर्च बटन क्लिक करा. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट करा. जर तुम्हाला तुमचा पीआयडी माहीत नसेल तर तुमचा प्रभाग क्र., जुना मूल्यांकन क्र., नवा मूल्यांकन क्र., मालकाचे नांव किंवा मोबाईल क्रमांक या निकषांद्वारे ‘सर्च’चा वापर करा. त्यानंतर सर्च बटन केल्यास तुम्हाला तुमच्या मालमत्तेचा तपशील मिळू शकतो.

 belgaum

व्ह्यू लिंक वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या संपूर्ण मालमत्ता घराचा तपशील उपलब्ध होऊ शकतो. कृपया पेमेंट करण्यापूर्वी चलन डाऊनलोड करा. कारण एकदा का पेमेंट झाले तर तुम्हाला चलन पाहता येणार नाही. यशस्वी ऑनलाइन मालमत्ता कर पेमेंटवर कृपया पोचपावती डाउनलोड किंवा प्रिंट करा. मालमत्ता कर पेटीएमद्वारे भरणार असाल तर त्यासाठी देखील पीआयडी नंबर आवश्यक आहे.

ऑनलाइन पेमेंटसाठी फॉर्म -2 मिळविण्यासाठी क्लिक करा किंवा कुठल्या पानावरील टॅक्स अँड पे ह्यू करा. मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यानंतर कृपया पोच पावती डाऊनलोड करा किंवा प्रिंट करा. एसएल नं. 35 हा रिबेट कॉलम असून तो ऑटो कॅलक्युलेटेड आहे. पेटीएमसाठी देखील पीआयडी नंबर आवश्यक आहे. जर तुम्हाला कर भरलेल्याची पोचपावती मिळाली नाही.

तर प्रथम https://belagavicitycorp.org/websiteBGM/PropertySear ch1.aspx येथे जा. पुन्हा तुमचा पीआयडी इंटर करा आणि व्ह्यू प्रेस करा. पुढल्या पानावर तपासा तुम्हाला 2022-23 ची रक्कम जमा झालेली दिसून येईल. त्यानंतर त्याच्याच बाजूला एकदम उजवीकडे डाउनलोडची लिंक दिसेल ती क्लिक करा आणि पोचपावती डाऊनलोड करून घ्या. जर ही प्रक्रिया प्रतिसाद देत नसेल तर

[email protected] याठिकाणी मेल करा. तुम्हाला परित ई-मेल मिळेल. यावेळी तुमचे स्पॅम फोल्डर देखील तपासा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.