Tuesday, June 18, 2024

/

आता शुक्रवार मंगळवार उचगावात मळेकरणी यात्रा होणार नाही

 belgaum

बेळगाव लाईव्ह : उचगावचे ग्रामदैवत तसेच बेळगाव तालुक्यातील भाविकांचे आराध्य दैवत, जागृत देवस्थान असणारे श्री मळेकरणी देवस्थान येथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणाऱ्या यात्रेवर ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि मळेकरणी देवस्थान समितीच्या वतीने उचगाव गावात बंदी घालण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सोमवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी आणि मळेकरणी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आलेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला आहे. उचगाव मधील श्री मळेकरणी देवस्थान परिसरात दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने उचगाव मध्ये होणारी वाहतूक कोंडी, मान म्हणून देण्यात येणाऱ्या जनावरांचे अवयव, टाकाऊ गोष्टी यामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या उद्भवत आहेत. तसेच देवीला मान देणारी येणाऱ्या पशुमानामुळे गावकऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उचगाव ग्रामसभेने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे.

आगामी एक जून पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे उद्या मंगळवारी 28 रोजी उचगाव श्री मळेकर यांनी देवीच्या मंदिर परिसरात शेवटची यात्रा भरणार आहे.

 belgaum

गेल्या काही महिन्यापासून उचगावात दर मंगळवारी आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. याठिकाणी देण्यात येणाऱ्या पशुमानाच्या बळीमुळे आसपास परिसरात प्रदूषण आणि दुर्गंधीचा फैलाव होत होता. यामुळे या परिसरातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याशिवाय या परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलांना देखील याचा त्रास सहन करावा लागत होता.Uchgav

जत्रेला जाणाऱ्या मध्यपीकडून दारूच्या बाटल्या शेतात फेकणे, शेतशिवारात जेवणाच्या पंगती बसवून कचरा टाकणे यासारखे अनेक प्रकार याठिकाणी घडत असल्याने याची दखल घेत ग्रामसभेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यापुढील काळात मंगळवारी आणि शुक्रवारी होणाऱ्या यात्रा आता उचगाव मध्ये होणार नसून श्री मळेकरणी देवीच्या नावाने दिला जाणारा मान आता केवळ गावातच नाही तर देवीचा अंगारा लावून कुठेही जाऊन दिला जाऊ शकतो. कुणीही उचगाव  गाव परिसरात यात्रा करू नये आपापल्या घरी करावा असा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांनी जिल्हा प्रशासनाकडे सदर यात्रेवर बंदी घालण्याची मागणी केली होती त्याची दखल घेत प्रशासनाने स्थानिक ग्राम पंचायत आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार  ग्राम सभा बैठक घेण्यात आली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

या ग्रामसभेत ग्रा.पं.अध्यक्ष मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, पंचायत विकास अधिकारी शिवाजी माडीवाल, श्री मळेकरणी देवस्थानाचे कमिटी देसाई बंधू यासह पुंडलिक कदम युवराज कदम, बी एस होनगेकर , एल एस होनगेकर दीपक पावशे, गावातील पंच ग्राम पंचायत सदस्य युवक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.