Monday, June 17, 2024

/

शिवमूर्ती अवमान प्रकरणी ३५ जणांची नावे वगळली

 belgaum

बेळगाव लाईव्ह :२०२१ साली बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेविरोधात बेळगावमध्ये शिवभक्तांच्या वतीने धर्मवीर संभाजी चौकात निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले.

यादरम्यान खडे बाजार पोलिसांनी एकूण 48 जणांवर राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली तक्रार दाखल केली होती. पण शिवभक्ताने या विरोधात उच्च न्यायालय धावून पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचे पुरावे दिल्यामुळे 35 जणांची या खटल्यातून नवे वगळण्यात आली आहेत.

एकूण 35 जणांनी आपल्यावर खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडे अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने कागदपत्रांची छाननी करून सदर 35 जणांवर करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत ३५ जणांची नावे खटल्यातून वगळण्यात आली.

 belgaum

यामध्ये भरत मेनसे, बळवंत शिंदोळकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक सुतार, सुनील लोहार, मंगेश माळवी, विनायक सुतार, गजानन जाधव, विनायक कोकितकर, दयानंद बडसकर, सुरज गायकवाड, राहुल भराले, गौरांग गेंजी, सरिता पाटील, लोकनाथ राजपूत, महेश मोदगेकर, नागेश काशीलकर,

राहुल सामंत, सिद्धू गेंजी, गणेश येळ्ळूरकर,विकी मंडोळकर, सुरज शिंदोळकर, भालचंद्र बडसकर, विनायक हुलजी, हरीश मुतगेकर, भागेश नंद्याळकर, रितिक पाटील, राजेंद्र बैलूर, श्रेयस खटावकर, शशिकांत अरकेरी, शुभम ठाकूर, प्रशांत चव्हाण, प्रज्वल किटवाडकर, विश्वनाथ गडकरी आदींचा समावेश होता. याप्रकरणी ॲड. राम घोरपडे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.