Sunday, June 16, 2024

/

पांढरे डाग कोड : उपचार काय?

 belgaum

पांढरे डाग म्हणजेच कोड: बऱ्याच रुग्णांना आपल्या घरात कुणाला हा आजार होता का, हे सांगता येत नाही. कारण आपल्याला पांढरे डाग आहेत याची वाच्यता करणे सहसा लोक टाळतात.

कोडाच्या डागांवर अनेक उपचार आहेत.

डाग येणे आणि पसरणे थांबवणे हा या उपचारांचा पहिला टप्पा असतो. तर दुसऱ्या टप्प्यात श्वेतत्वचेत पुन्हा रंग आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. डाग कमी प्रमाणात असतील तर त्यावर वरून औषधे लावून, जोडीने पोटात काही औषधे घेऊन डागांची वाढ थांबवता येते. ‘अल्ट्राव्हायोलेट लाईट थेरपी’त विशिष्ट तरंगलांबीच्या अतिनील किरणांचा वापर करून डागांतील रंगपेशींनी पुन्हा काम करावे यासाठी उपचार केले जातात. लहान डागांसाठी लेझर थेरपीचाही वापर केला जातो. डागांवर वरून औषध लावून त्यांना सूर्याचे ऊन देणे ही पद्धतही अनेक वर्षांपासून यशस्वीपणे वापरली जात आहे.

 belgaum

लग्नाच्या वयातील रुग्णांना शरीराच्या दर्शनी भागात पांढरे डाग असतील तर रुग्ण मुळातच सामाजिक कुचंबणेला सामोरा जात असतो. त्यामुळे उपचारांच्या परिणामांसाठी महिनोंमहिने थांबण्याची अशा रुग्णांची तयारी नसते. डागांवर औषध लावणे, नंतर सूर्यप्रकाशाचा उपचार घेणे या गोष्टी नियमित करणे अनेक जणांना शिक्षण किंवा नोकरी- व्यवसायातील व्यस्ततेमुळे जमत नाहीWhite patch code

नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या डागांमध्ये हळू- हळू रंग परत येताना दिसतो, डाग वाढणेही थांबते. पण डागांमध्ये रंग येण्यासाठी किती काळ वाट पाहावी यालाही मर्यादा आहेत. उपचार घेऊनही डागांमध्ये रंग येतच नसेल तर तिथे रंगपेशी नाहीत हे स्पष्ट होते. डागांमधील रंगपेशी पूर्णपणे नष्ट झाल्या असतील तर वरून कितीही उपचार केले तरी त्या नव्याने तयार होत नसतात.

अशा वेळी त्वचा रोपण किंवा पेशी रोपणाचे उपचार करता येतात. मात्र त्वचेवर डाग वाढत असतील किंवा पसरत असतील तर मात्र त्यांची वाढ थांबवल्याशिवाय त्वचा रोपण किंवा पेशी रोपणाचा पर्याय सुचवला जात नाही.
होमिओपथी- पुष्कळ फरक पडतो. परंतु सातत्य आवश्यक असते.

9916106896
9964946918 (अधिक माहिती किंवा उपचारासाठी संपर्क साधू शकता डॉ सोनाली सरनोबत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.