Friday, March 29, 2024

/

पाडव्यानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

 belgaum

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभि नाईस कम्युनिकेशनचे मालक अभिजीत बेकवाडकर व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी गुढीपाडव्यानिमित्त आझमनगर येथे महापालिका सफाई  कामगारांना मिठाईचे वाटप केले.

गुढीपाडव्यानिमित्त अभि नाईस कम्युनिकेशनचे मालक अभिजीत बेकवाडकर व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी आझमनगर, प्रभाग क्र. 25, बीट नंबर 11 येथील महापालिका सफाई कामगारांना मिठाई वाटली.

सणासुदीच्या दिवशी देखील महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी जनतेची सेवा करण्यात व्यस्त असतात. या कर्मचाऱ्यांना गुढीपाडवा सणाचा आनंद मिळवून देण्याच्या उद्देशाने अभिजीत बेकवाडकर व प्रसाद चौगुले यांनी हा मिठाई वाटपाचा उपक्रम राबविला.

 belgaum

याप्रसंगी महापालिकेचे सुपरवायझर संजय मोरे, संजय राठोड, अप्पाया शिंदे (कामगार प्रमुख) आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.