Thursday, March 28, 2024

/

खुनाच्या घटनेने हादरले रणकुंडये…

 belgaum

दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घरावर हल्ला करून तोडफोड करत एकावर धारधार शस्त्राने हल्ला करत खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील रणकुंडये येथे घडली आहे.

शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेमध्ये रणकुंडये गाव हादरले आहे.नागेश भाऊसाहेब पाटील वय 32 असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून मयत नागेश यांचे भाऊ देखील गंभीर जखमी झाले आहेत.

बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसांत झालेला हा चौथा खून आहे या अगोदर भवानी नगर, बाळेकुंद्री आणि किल्ला तलावा जवळ खुनाच्या घटना घडल्या होत्या.

 belgaum

सूत्रांनी रणकुंडये घटने बद्दल दिलेल्या माहितीनुसार नुसार शनिवारी रात्री दीडच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घरावर समोर लावलेल्या दुचाकीची मोडतोड केली त्या वेळी नागेश याच्यावर धारधार शस्त्रांनी वार केला या घटनेत नागेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर नागेश याचा भाऊ मोहन याच्यावर देखील हल्ला करण्यात आला असून तो या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. मोहनवर इस्पितळात उपचार सुरू आहेत.Murder rankundaye

मयत नागेश हा नेव्हीत सेवेला होता नोकरीचा राजीनामा देत तो एक खाजगी कंपनीत कामाला होता.हा खून कुणी केला याचें नेमके कारण अस्पष्ट आहे.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी भेट देत पहाणी केली असून पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदीश्वर अधिक तपास करत आहेत.

रणकुंडये खूनाचे नेमकं कारण काय?मध्यरात्री घरावर हल्ला करून खून करणारे ते दोघे कोण याचा तपास पोलीस घेताहेत.एकूणच गेल्या पंधरा दिवसातील बेळगाव शहर परिसरातील हे चौथे खून प्रकरणं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.