बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि स्टेशनचे कमांडर आणि शाळेच्या स्थानिक प्रशासन मंडळाचे (LBA) अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी १६ एप्रिल २०२२ रोजी बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला भेट दिली व विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय सुधारणांबाबत प्राचार्यांनी माहिती घेतली.
यावेळी नव्याने नूतनीकरण केलेल्या स्क्वॉश कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कॅम्पसमध्ये फिरून शैक्षणिक ब्लॉक, आर्ट गॅलरी आणि कॅडेट वसतिगृहांना भेट दिली व तेथील प्रताप हाऊसमध्ये केलेल्या नूतनीकरणाचा (विशेष कामांचा) आढावा घेतला. यावेळी आयोजित केलेल्या विशेष शालेय संमेलनात, वार्षिक शालेय मासिक ‘प्रतिबिंब’चे प्रकाशन मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.
कॅडेट हार्दिक तोमर, कॅडेट रौशन रंजन यांचा पुरस्कार देऊन सत्कारही केला, तसेच संतोष भद्री यांना ‘महिन्यातील सर्वोत्तम कर्मचारी’ पुरस्काराने गौरविले.
कॅडेट्स आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर मुखर्जी म्हणाले की, ‘प्रत्येकामध्ये काही विशिष्ट प्रतिभा असते. कॅडेट्सनी त्या लपलेल्या प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांची यशोगाथा लिहिण्यासाठी त्यावर काम करणे आवश्यक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वोच्च क्रमाची शिस्त आवश्यक आहे. भारावून न जाता चांगला अभ्यास आणि सहअभ्यास कौशल्ये आत्मसात करा. ज्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) प्रवेश मिळवण्याचे ध्येय गाठण्यात मदत होईल.’