बेळगाव शहरांमध्ये गांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी सायलेंट मोहीम राबवली असताना दुसरीकडे खंजर गल्ली परिसरामध्ये पोलिसांनी आपला खाक्या दाखवत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
मार्केट पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या जवळील 500 ग्रॅम गांजा जप्त केलेला आहे.खंजर गल्लीतील त्या जागेचा पार्किंग म्हणून बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी सदुपयोग करून घेणार आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बेळगाव मनपाने कोट्यावधी रुपयांचा प्रस्ताव तयार करून बहुमजली पार्किंग झोन बनवला जाणार होता मात्र हा परिसर हळूहळू गांजा विक्री केंद्र बनू लागला आहे.
युनूस अब्दुल खादर मकानदार 23 वय रा खंजर गल्ली आणि पंजीबाबा येथील सलमान अब्दुल हमीद व 24 या दोघांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.
या ठिकाणी बहु मजली पार्कींग स्थळ झाल्यास बेळगाव खडेबाजार गणपत गल्ली काकती वेस मधला पार्किंग वरचा भार कमी होणार आहे. महानगरपालिकेच्या वतीनं सहा वर्षांपूर्वी कोट्यवधी निधींचा बहुमजली पार्किंग करण्याचा प्रस्ताव होता त्याची सुरुवात अद्याप झालेली नाही मात्र ही जागा गांजा विक्री करण्याचा केंद्र बनत चाललेले हे दुर्दैव आहे.
याच ठिकाणी ट्रॅफिक आणि मार्केट पोलीस स्थानक बनवण्याचा देखील प्रस्ताव होता मात्र त्याच्या देखील हालचाली होताना दिसत नाही आहेत.