Tuesday, April 30, 2024

/

‘घरासमोर पार्क केलेल्या फोडल्या वाहनांच्या काचा’

 belgaum

घरासमोर पार्क केलेल्या कार गाड्यांच्या काचा फोडण्याच्या घटनांची साखळी बेळगावात चालूच आहे. कधी एका उपनगरात तर कधी दुसऱ्या उपनगरात घरासमोर आलेल्या वाहनांच्या काचाना अज्ञातां कडून लक्ष केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे.

शनिवारी सकाळी महंतेश नगर परिसरातील दोन कारच्या ग्लास  अज्ञातांकडून फोडण्यात आल्या तर महंत भवन जवळ असलेल्या चौकात सहा ठिकाणी घरासमोरील कारना लक्ष करण्यात आले आहे. पोलिसांना सदर कारच्या काचा फोडणारे सी सी टी व्ही कैद झालेत का? याचा तपास करावा लागणार आहे.Car glass

नुकसान झालेल्या कारचा मालकांनी याप्रकरणी माळमारुती पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. माळ मारुती पोलिसांनी कारची पहाणी केली आहे .घरा समोर कार पार्क करणारे महंतेशनगर अंजनेयनगर अशोक नगर आदी परिसरातील रहिवाशी भीतीच्या छायेखाली आहेत.

 belgaum

पोलिसांनी अशा कारच्या काचा फोडणाऱ्या विघ्न संतोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.एकूणच बेळगाव शहरात रात्रीच्या  वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.