काकतीवेस गल्ली, मेन रोड येथे रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवताच महापालिकेतर्फे या ठिकाणच्या कचऱ्याची उचल करून स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती फलक बसविण्यात आला.
काकतीवेस गल्ली, मेन रोड येथे रस्त्याकडेला तिला कित्येक वर्षापासून आसपासच्या नागरिकांकडून कचरा टाकला जात होता मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यामुळे याठिकाणी कचर्याचा ढिगारा साचून कायम अस्वच्छतेचे साम्राज्य पहावयास मिळत होते.
मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छ ते बरोबरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे वातावरण नसरत होते. त्यामुळे आसपासचे दुकानदार आणि रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरावे लागत होते.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार आवाज उठवला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडे पाठपुरावा सुरू ठेवला. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या स्वच्छता विभागाने आज गुरुवारी सकाळी संबंधित ठिकाणच्या कचऱ्याची उचल करून परिसर स्वच्छ केला. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती फलक लावला. या फलकावर आसपास सीसीटीव्ही कॅमेरा आहेत.
तेंव्हा कोणी कचरा टाकताना आढळल्यास 500 ते 5000 रुपयांपर्यंतच्या दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देणारा मजकूर ही नमूद आहे. दरम्यान काकतीवेस गल्ली, मेन रोड येथील रस्ता शेजारील संबंधित कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उचल झाल्याने परिसरातील दुकानदार आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.