अभ्यास करत नाही म्हणून रागावलेल्या आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जवळील गणेशपुर भागात घडली आहे.
गणेशपूर येथील पेशाने डॉक्टर असलेल्या भारती उपेंद्र यलगुद्री वय 47 असं आत्महत्या केलेल्या या दुर्दैवी महिलेचं नाव असून तिने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
गणेशपूर येथे राहत्या घरी तीने रात्रीच्यावेळी गळ्याला फास आवळून आत्महत्या केली ही घटना तिच्या घरच्या लक्षात येताच तिला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारांचा काहीही उपयोग न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कॅम्प पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे