नुकताच गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतलेले प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सकाळी बेळगाव येथील आरएसएसच्या कार्यालयाला भेट दिली.सावंत यांनी स्थानिक आर एस एस पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
बेळगाव येथे एका खासगी समारंभात सहभागी होण्यासाठी सावंत बेळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी बेळगाव येथील आर एस एस मुख्यालयाला भेट दिली आहे.
यावेळी प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना 2024 लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला कोणत्याही गावात मी गेलो तर तिथल्या संघाच्या कार्यालयाला भेट देतो त्याप्रमाणेचं बेळगावातील संघ कार्यालयालामी भेट दिली आहे ती नमूद केले.
बेळगाव चा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी कोल्हापूरला जाऊन श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. तिथल्या कोल्हापूरच्या मित्रानी माझा सत्कार कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे.
गोव्यातील पर्यटन उद्योगावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाईल असे सांगत हिजाब किंवा हलाल बद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.