Sunday, November 24, 2024

/

‘ईश्वरप्पा जबाबदार’-सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या ठेकेदाराची आत्महत्या

 belgaum

माझा मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा जबाबदार आहेत असा सुसाईड नोट लिहून बेळगाव हिंडलगा येथून बेपत्ता झालेल्या ठेकेदाराने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

मंत्री के एस ईश्वरप्पा 40 टक्के कमिशन मागत आहेत असा आरोप करून खळबळ माजवलेले ठेकेदार संतोष पाटील यांनी सुसाईड नोट मध्ये माझ्या मृत्यूला ईश्वरप्पा जबाबदार आहेत असे लिहून बेपत्ता झालेल्या ठेकेदाराने उडुपी येथील लॉज मध्ये आत्महत्या केली आहे.

ठेकेदाराने पत्रकारांच्या व्हाट्स अप्प ग्रुप ला सुसाईड नोट मेसेज केला होता त्या नंतर पोलिसांनी संतोष पाटील यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली होती त्यानुसार संतोष पाटील यांचा मोबाईल उडुपी मध्ये ऍक्टिव्ह असल्याचे तपासणीत पुढे आले होते त्यानुसार त्यांचा मृतदेह उडुपीत सापडला आहे.Santosh patil

हिंडलगा येथील समर्थ कॉलनीतील त्या ठेकेदाराच्या घराला कुलूप लावण्यात आला होता गेल्या एका आठवड्यापासून घर बंद असल्याची माहिती मिळत होती.

आपण केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत ठेकेदार संतोष पाटील चर्चेत आले होते त्यानंतर उडुपी येथील शंभवी लॉज मध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची उघडकीस आले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.