Friday, April 26, 2024

/

‘या मंडळाने असे साजरे केले नवीन वर्ष’

 belgaum

बाळगोपाळा करीत विविध स्पर्धा घेत समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळ संचलित दुर्गाशक्ती महिला मंडळाने गुढी पाडव्या निमित्त नवीन वर्षाच्या स्वागत केलं

समर्थ नगर येथील एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग,समर्थ नगर याच्या वतीने लहान मुलं मुलीसाठी पारंपारिक वेशभूषा करून ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, छत्रपती श्री शिवाजी महाराज,धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या वर आधारित प्रश्न मंजुषा, तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी समर्थ नगर मधील जेष्ठ नागरिक ओकाराम मेवाड,सुधाकर कडोलकर,नागेश गावडे, निर्मल कणेरी, आप्पाजी कुंडेकर, लक्ष्मण कुंडेकर, मळाप्पा सुलगेकर, अरुण गावडे, माला कणेरी, मंगल गावडे, शांता लोहार, सावित्री कणेरी ,अनंत देशपांडे, पांडुरंग कुलकर्णी आदी उपस्थित होतेChildrens

 belgaum

या स्पर्धेमध्ये 100 मुलामुलींनी सहभाग घेतला होता स्पर्धा शनिवार दिनांक 2/4/22 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्ती समोर श्री एकदंत सांस्कृतिक भवन विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगांव येथे घेण्यात आले.

एकदंत युवक मंडळाच्या दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या वतीने महिला लहान मुलांकरिता अनेक उपक्रम राबवले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.