Sunday, September 1, 2024

/

‘बर्निंग कार’ मुळे रस्त्यावर तारांबळ!

 belgaum

शहरातील गजबजलेल्या संगोळी रायान्ना मार्गावर एका सेंट्रो कारमधून अचानक धूर येऊ लागल्यामुळे पोलीस आणि तिथे उपस्थित नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे घटना आज सकाळी घडली. तथापि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.

जिल्हाधिकारी कार्यालया समोर असलेल्या शहरातील गजबजलेल्या संगोळी रायान्ना मार्गावर आज सोमवारी सकाळी एका सेंट्रो कारमधून अचानक धूर येऊ लागला.Car

हा प्रकार तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येताच एकच तारांबळ उडाली. त्यातच दहावीचा गणिताचा पेपर असल्याने तेथून विद्यार्थी देखील जात होते. त्यावेळी पोलिसांनी पाणी आणून लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तथापि कारमधून धूर येतच राहिला.

पोलिस अधिकाऱ्यांनी तेंव्हा कारचे बाॅनेट उघडण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला. अखेर अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन कुलिंग ऑपरेशनद्वारे अर्थात पाण्याचा फवारा मारून कारला लागलेली आग विझवली. कारमधून धूर येणे बंद होताच उपस्थित सार्‍यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.