आवड असेल तेच करा. पण आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेउन जिद्दीने मेहनत घेतल्यास ध्येय गाठणे अवघड नाही असा कानमंत्र दिला आहे. बेळगाव येथील प्रतीक प्रकाश खंदारेने, घरची परिस्थिती बेताची असूनही हा बेळगावकर गुणवंत, केंद्र सरकारच्या स्काॅलरशिप योजनेतून दिल्या जाणाऱ्या ७५ लाखाच्या शिष्यवृतीचा मानकरी ठरला आहे. ही किमया त्याने साधली आहे अभ्यासातील सातत्य आणि हार न मानण्याच्या दृष्टिकोनामुळे…
बेळगाव पार्वतीनगर येथील विद्यार्थी प्रतीक खंदारे याने केंद्र सरकारची 75 लाखांची आणि सिडनी युनिव्हर्सिटीची 10 लाखांची शिष्यवृत्ती मिळवत ऑस्ट्रेलिया मधील सिडनी विश्व विद्यालयात शिकण्याची संधी मिळाली आहे.प्रतिकच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्र सरकारच्या योजनेतून देशभरातून १०० विद्यार्थ्यांची निवड ओव्हर सीज शिष्यवृत्तीसाठी केली जाते.यात बेळगावच्या प्रतीकने पहिल्या दहा मध्ये रँकिंग मिळवत बाजी मारून बेळगावचे नाव उज्वल केले आहे.वडील प्रकाश गोकुळ खंदारे व आई वैशाली यानी त्याच्या जिद्दीच्या पंखाना बळ दिले, तर बेळगावच्या शिवाजी किल्लेकर, कोल्हापुरातील महालक्ष्मी अकॅडमीचे प्रा.अभय केळकर यानी त्याला योग्य मार्गदर्शन केले.आंबेडकर दिनाचे औचित्य साधून प्रतीक ची झालेली निवड ही परदेशात शिक्षण घेऊन करियर करण्याची आस बाळगणाऱ्या तरूणाईच्या मनात नक्कीच प्रेरणा देणारी आहे यात शंका नाही.
बेळगावातील के एल एस स्कुलमधून १ली ते दहावी आणि मग जी एस एस कॉलेज मधून बारावीचे शिक्षण पूर्ण करत जी आय टी कॉलेज मधून बी ई इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे.
मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मास्टर इन प्रोफेशनल इंजिनिअरिंग मेकॅनिकल परदेशात करायचा मानस होता त्यासाठी त्याने तयारी केली होती.
शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीच्या दृष्टीने असणाऱ्या परीक्षांची माहिती घेऊन प्रतिक तयारी सुरू केली. परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी I.E.L.T.S. ( ही परीक्षा English writing, speaking, reading व listening वर बेतलेली असते). उतीर्ण होणे आवश्यक होती उत्तीर्ण होत ऑस्ट्रेलिया मधील नामांकित कॉलेज मध्ये शिष्यवृत्ती सह दाखला मिळवला आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठाचे जगात 38 रँकिंग आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले खडतर मेहनत घेऊन काहीही साध्य करू शकतात हेच प्रतीक याने ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीत शिष्यवृत्तीसह दाखल मिळवत करून दाखवले आहे.