Sunday, December 22, 2024

/

बेळगावच्या शिवराजचा ‘बयान’ व्हीडिओ गाजतोय

 belgaum

बेळगावच्या चव्हाट गल्लीतील कलाकार शिवराज चव्हाण याचा लिफाफे या अल्बम मधील ‘बयान’ हा व्हीडिओ सध्या यु ट्यूबवर रिलीज झाला आहे. BAYAAN हे अनुराग मिश्रा यांच्या नवीन मूळ अल्बम lifafe मधील तिसरे गाणे आहे.

खरे प्रेम काय असते आणि ते शब्दांवर कसे अवलंबून नसते हे यात दिसून येतंय या व्हीडिओ मध्ये दिसून आलं आहे.

Bayaan या व्हीडिओ मध्ये शिवराज चव्हाण हा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असून सोबत अंजली वर्मा यांनी देखील काम केलंय. याच अल्बम साठी बेळगावचा युवक अभिषेक कांबळे याने शूट केलं तर श्रीधर गोडसे हा टेक्निकल काम पाहिले आहे.बेळगावच्या तिघांनी बनवलेला हा अल्बम सध्या गाजत असून लोकांना तो आवडत देखील आहे.Bayaan third song

शिवराज चव्हाण हा चव्हाट गल्लीत रहाणारा युवक दिग्दर्शक आहे.त्याने अनेक नाटकात काम केलं आहे जवळपास वीस नाटकात त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.या शिवाय पाच चित्रपटाना सहाय्यक दिग्दर्शन केलं आहे. बयांन हा त्याच्या गाण्याच्या दुसरा अल्बम आहे.आगामी काळात देखील मोठा चित्रपट करण्याची त्याची तयारी सुरू आहे.

बेळगावात मराठी नाटकं टिकली पाहिजेत त्यासाठी शिवराज आणि त्याच्या संघाने नाटकाशी चांगली चळवळ उभी केली आहे.बेळगावमधून मोठे चित्रपट बनावेत असा त्याचा मानसआहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.