एपीएमसी पोलिसांनी धाड टाकून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करत त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि गांजा जप्त केला आहे.
नितीन सुरेश मकवानी वय 37 रा. आंबेडकर नगर बेळगाव,नईम अब्बास खोजा वय 28 रा. असद खान सोसायटी बेळगाव या दोघांना अटक करून त्यांच्या जवळील 1 किलो 400 ग्रॅम गांजा आणि 800 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
ए पी एम सी पोलिसाना रविवारी बॉक्साईट रोड जवळील भारत नगर येथे गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळताच धाड टाकून दोघांनाही गांजा विक्री करताना रंगेहाथ पकडले .
ए पी एम सी पोलीसात फिर्याद दाखल झाली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ए पी एम सी पोलिसांचे या कारवाईसाठी अभिनंदन केलं आहे.