Thursday, March 28, 2024

/

पवार यांच्या घरावर हल्ल्यास जबाबदार दोषींवर कारवाई करा’

 belgaum

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत बेळगावातील विविध संघ संघटनानी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.

बेळगावजिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देत बेळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस, समिती शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत मागणी केली आहे.निवेदनाच्या प्रति केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी जत्ती मठात झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेला भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता आता दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.Pawar

 belgaum

यावेळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांची भेट घेऊन निवेदनाची प्रत तात्काळ बेळगाव जिल्हाधिकार्‍यांनी पंतप्रधानांना पाठवावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर,प्रकाश मरगाळे वकील एमजी पाटील ,धनंजय पाटील ,किरण हुद्दार,सदानंद पाटील, राष्ट्रवादीचे केजी पाटील अमोल देसाई, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.