महिलांचे लाडके व्यासपीठ तारांगण अखिल भारतीय साहित्य परिषद व जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तुत्वाचा कौतुक सोहळा हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.३०. वाजता डॉ. शकुंतला गिजरे सभागृह, सरस्वती वाचनालय कोरे गल्ली या ठिकाणी आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात बेळगाव सीमा भागातील १० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होणार आहे. घर संसार सांभाळून सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला आहे. समाजामध्ये जागृतीचे कार्य केले आहे. अशांचा सन्मान होणार आहे. नुकताच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये बेळगावच्या आशा पत्रावळी यांची विश्वविक्रमाची नोंद झालेली आहे यांचादेखील सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.
सिंथिया फर्नांडीस, रुक्मिणी निलजकर, सुधा भातखंडे,लता पावशे, ज्योती बामणे, प्रा.मनीषा नाडगोडा,श्रद्धा हेरेकर, जयश्री पाटील, सुरेखा पाटील, सिमरन गौंडळकर या सत्कार मूर्ती आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ग्रीष्मा गिजरे ,डॉ. मंजुषा गिजरे, प्रा. स्वरूपा इनामदार उपस्थित राहणार आहेत.
आजकालच्या महिलांच्या साठी वंधत्व हा एक आजार वाढीस लागला आहे.
आणि हा या वंधत्व वाढीस कोणकोणती कारणे आहेत ती महिलांच्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम करतात. यावर डॉ. ग्रीष्मा गिजरे यांचे व्याख्यान होणार आहे. वंधत्वावर उपचार पद्धती कोणती आहे याचेही मार्गदर्शन डॉ. ग्रीष्मा गिजरे या करणार आहेत