रयत गल्ली, माधवपूर वडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आणि मॅरेथॉन धावपटू शाहीर यल्लाप्पा नागाप्पा बिर्जे (वय 77) यांचे आज गुरुवार सायंकाळी सव्वा पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
माजी बेळगाव श्री शरीरसौष्ठवपटू शिवाजी बिर्जे आणि आर्टिस्ट नागेश बिर्जे यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन चिरंजीव, सुना, दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबई 42 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये त्यांनी सलग दहा वर्षे भाग घेऊन बेळगावचा लौकिक वाढविला होता. बेळगाव जिल्हा इस्पितळात वार्ड बॉय म्हणून 35 वर्षे सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले होते. दोन-तीन चित्रपटातही त्यांनी लहानसहान भूमिका बजावल्या होत्या. जाणता राजा या महानाट्यात त्यांनी भूमिका केली होती.