Saturday, April 27, 2024

/

बेळ्ळारी नाल्याच्या पुलाची आमदारांनी केली पाहणी

 belgaum

बसवन कुडची येथील बेळ्ळारी नाल्यावर जुना ब्रिज मोडकळीस आला होता शेतकऱ्यांना वावर करण्याकरिता समस्याचा सामना करावा लागत होता.

यासाठी गावातील शेतकऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांच्याकडे मागील वर्षी निवेदन देऊन नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी केली होती.

त्यानुसार उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी मागच्या महिन्यामध्ये या पुला करिता निधी मंजूर करून भूमिपूजन केले होते.Benke

 belgaum

भूमीपूजनाच्या एका महिन्यांमध्ये ब्रिज बांधून पूर्ण झाला असून रविवारी आमदार बेनके यांनी या ब्रिजची पाहणी केली.यावेळी आमदारांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या

यावेळी बोलताना म्हणाले की या पुलाचा वापर शेतकऱ्यांनी योग्य करावा योग्य तो करावा. यापुढे कोणतीही समस्या होणार नाही नसल्याचे आमदारानी सांगितले.यावेळी बसवन कुडची येथील शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या सर्व उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.