गवतात जळून खाक झालेल्या मृतदेह प्रकरणाचा माळ मारुती पोलिसांनी छडा लावला आहे. केवळ48 तासांत या खून प्रकरणाचा छडा बेळगाव पोलिसांनी लावला आहे.या घटनेतील मृत व्यक्ती ही चंदगडची असून त्याचे नाव संतोष परीट असे आहे.
या प्रकरणी परशुराम कुरबुर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मृत संतोष याची पत्नी रूपा हिचे कणबर्गी गावातील परशुराम कुरबुर याच्याशी अनैतिक संबंध होते.
संतोष हा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी दुचाकीवरून आलेला असताना परशुराम याने त्याला घेवून जावून मोकळ्या जागेत मद्यपान केले.संतोष हा मद्याच्या नशेत असताना परशुराम याने त्याचा आपल्याकडील टॉवेल ने त्याचा गळा दाबून खून केला आणि नंतर त्याला गवतात जाळले.
हे प्रकरण म्हणजे पोलिसांना आव्हान होते.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अठ्ठेचाळीस तासात संशयितांना गजाआड केले.
माळ मारुती पोलीसांनी कमी वेळेत या खून प्रकरणाचा छडा लावल्याने पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या आणि पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.
गांजा विक्री करणारा युवक अटकेत
सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या एका 20 वर्षीय युवकाला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी जवळपास बत्तीस हजार रुपये दोन किलो गांजा जप्त केला आहे.
राहुल बसवराज सुतार वय 20 वर्ष राहणार जय नगर मच्छे असे गांजा विक्री करणाऱ्या त्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सी ई एन पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टिपू सुलतान नगर जैन कॉलेज जवळ एका ठिकाणी गांजा विक्री करताना राहुल याला रंगेहात पकडले आणि त्याच्या जवळ त्याच्या जवळील गांजा जप्त केला.या प्रकरणी सीईन पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.