Monday, April 29, 2024

/

रिंग रोड जमीन संपादन विरोधात तालुका समिती उठवणार आवाज

 belgaum

रिंग रोड साठी बळकावण्यात येणाऱ्या सुपीक जमिनीचा एक इंच जमीन देखील संपादित व्हायला देणार नाही असा इशारा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला.अन्यायी आणि स्थानिक शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या भु संपदाना विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती जोरदार लढा देईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंग रोडच्या सुपीक जमीन संपादना विरोधात शनिवारी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले कि म्हणाले,की बेळगाव तालुक्यामध्ये होणाऱ्या रिंग रोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मारक ठरणार आहे. यापूर्वीही रिंग रिंग रोड सरकारने नोटीफिकेशन काढून आपला प्रस्ताव ठेवला होता,या विरोधात बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करून हा प्रस्ताव रद्द केला होता.परंतु परवाच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बेळगाव भेटीच्या वेळी हा रिंग रोड होणार असल्याचे सूचित केले होते या संदर्भात तालुक्यातील शेतकरी याला विरोध करणार आहेत,त्यासंदर्भात गावोगावी शेतकऱ्यांनी या संदर्भात आपली जमीन देणार नसल्याचे व तीव्र लढा देऊ बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती या संदर्भात गावोगावी जनजागृती करून मोठा लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.Mes meeting

 belgaum

रिंग रोड झाला तर परिसरातील सुपीक जमिनीला मोठा धोका आहे .यामुळे बेळगाव तालुक्यातील सुपीक जमीन घटणार आहे. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु सुपीक जमिनी या ना त्या कारणाने सरकार अनेक प्रकल्पासाठी बळकावत आहे. यामुळे सुपीक जमिनीचे व अन्नदान पिकाचे उत्पादन घटत आहे यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे असे त्यांनी नमूद केले.

जमीन संपादन रिंग रोड हा बेळगाव तालुक्यातील शेतीसंदर्भात मोठा धोका आहे तरी शेतकऱ्यांनी हा धोका हाणून पाडावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे .यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, वकील सुधीर चव्हाण वकील श्याम पाटील, सुरेश राजूकर, एपीएमसी सदस्य आर के पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सचिव विलास घाडी, महादेव कंग्राळकर, पी के तरळे ,आर आय पाटील, संजय पाटील ,मनोहर संताजी,अनिल पाटील,महादेव बिर्जे,पुंडलिक पावशे, रावजी पाटील,विनायक तरळू, शिवाजी कुटरे शंकर चौगुले, व अनेक महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.