Friday, January 10, 2025

/

‘आम्ही पापाचे धनी…बळळारी नाल्याची कर्म कहाणी’

 belgaum

ऐन उन्हाळ्यात बेळगावातील नाल्यावर बर्फ पसरला आहे का? ही दृश्ये कुठल्या बर्फाळ प्रदेशातील नसून हा आहे आपला बळळारी नाला…
शेतकऱ्यांनी कित्येकदा विनवणी करून देखील नाल्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले गेले त्यामुळे पाणी दूषित होऊन पांढरा फेस आला आहे.

बेळगाव परिसरातील पाण्याचे स्त्रोत्र सुरक्षित आहेत का? हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे पाणी ही रिसायकलिंग होणारी बाब आहे वापरातील पाणी जमिनीत झिरपून व बाष्प रूपाने पावसात रूपांतरीत होऊन परत एकदा शुद्ध पाण्याच्या रुपात आपल्या कडे परत येतात.

या पाश्र्वभूमीवर वर बेळगावात जमीनित मुरणारे सांडपाणी हे केमिकल मिश्रित झाल्याने ते पाणी दूषित बनले आहे त्याच बरोबर त्या पाण्यामुळे जमीनही नापिकव खराब होत चालली आहे. प्रशासनाचा म्हणावा तसा धाक या केमिकल वापर करणाऱ्या लोकांवर राहिला नाही.दूषित झालेले पाणी सर्रास नाल्यात सोडून एकंदर जलस्त्रोस्त्रानाचं हानी पोचवण्याचे काम या लोकांकडून होत आहे.Bellari nala

येळ्ळूर बेळळारी नाल्यात रसायन मिश्रित पाणी सोडल्याने फेसचं फेस भरून गेला आहे.पूर्ण बळळारी फेसाने पांढरा शुभ्र झाला आहे ही लक्षण बेळगाव शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून धोक्याची घंटा आहे.दरवर्षी बुझलेल्या बेळळारी नाल्यामुळे परिसरात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते बेळळारी नाला गटार गंगा नसून एकेकाळीचा खळाळता ओढा होता या जीवनदायी ओढ्याचे रूपांतर सांडपाण्यात करण्याचे पाप बेळगाव महापालिकेने केले.

येळ्ळूर आणि आजू बाजूच्या परिसरातील शिवाराचा भाग्यविधाता असणारा बेळळारी नाला हिडीस आणि सडक्या पाण्याचा नाला बनला आहे याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन आहे

इंग्लंड मधील लंडन मध्ये थेम्स नदी अशीच गटारात रूपांतरित केली होती त्यामुळे तिच्या आजूबाजूला रोगराईचे प्रमाण खूप वाढले पण ब्रिटिश दृष्ट्या लोकांच्या नियोजनामुळे ती नदी सुंदर स्वच्छ आणि देखणी बनवली गेली आता जगातल्या नामांकित आणि सुंदर नद्यांच्या पैकी एक म्हणून तिला ओळखले जाते. बेळगावचा बळळारी नाला हा थेम्स नदी होईल का?…

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.