Sunday, July 21, 2024

/

बेळगावच्या मराठा नेत्यांनी केलं संभाजी राजे यांचे अभिनंदन..

 belgaum

बेळगावातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मुक्कामी खासदार संभाजी राजे यांची भेट घेत त्यांच्या अभिनंदन केलं. मुंबई मुक्कामी संभाजीराजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केले होते.

उपोषणाच्या मागण्यांची पूर्तता झाल्यानंतर संभाजीराजांचे पहिल्यांदाच कोल्हापूरला आगमन झालं त्या निमित्ताने कोल्हापूर मध्ये त्यांचेजल्लोषात स्वागत करण्यात आले या जल्लोषी स्वागत दरम्यान बेळगाव सीमा भागातील मराठा नेत्यांनी हजेरी लावली होती.  खासदार संभाजी महाराज यांचं अभिनंदन केलं

बेळगाव च्या वतीने गेलेल्या संभाजी महाराजांचे स्वागत करायला गेलेल्या शिष्टमंडळात मध्ये माजी महापौर शिवाजी सुंठकर,संजय मोरे तालुका युवाआघाडीचे संतोष मंडलिक पुंडलिक, पुंडलिक पावशे,लक्ष्मण लाळगे,बाळासाहेब देसाई, कुशल सुंठकरआदी यावेळी उपस्थित होते यावेळी बेळगावच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.Sambhaji raje

बेळगाव येथील मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी नुकताच बेंगलोर मुक्कामी जाऊन मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांची भेट घेण्यात आली होती त्यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले आहे यासाठी खासदार संभाजी महाराजांनी देखील बेळगाव मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी बेळगावच्या मराठा नेत्यांनी संभाजीराजे यांच्याकडे केली.

त्यावर संभाजीराजे यांनी आपण बेळगावला येऊन बेळगावच्या मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी नक्कीच पुढाकार घेण्याचे सूतोवाच करत मंजुनाथ स्वामींच्या सत्काराला बेळगावला येण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.