Friday, March 29, 2024

/

आता दररोज बेळगाव दिल्ली विमानसेवा

 belgaum

बेळगाव परिसरातील विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आनंदाची बातमी असून आठवड्यातून चार दिवस सुरू असणारी बेळगाव दिल्ली विमान सेवा आता दररोज सुरू होणार आहे.आगामी 27 मार्च पासून आता दिल्ली विमान सेवा दररोज सुरू होणार आहे.

बेळगाव ते दिल्ली या विमानसेवेचे वाढती मागणी लक्षात घेता स्पाइस जेटने 27 मार्च पासून बेळगाव दिल्ली ही नियमितपणे आठवड्यातून सात दिवस विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

बेळगाव ते दिल्ली,लेह ही विमान सेवा सुरुवातीच्या काळात आठवड्यातून केवळ तीन दिवस ही सेवा सुरू करण्यात आली होती मात्र या विमानसेवेचे त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता चार दिवस करण्यात आली आणि आता 27 पासून पूर्ण सात दिवस ही विमानसेवा होणार असून 27 मार्च नंतरचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

 belgaum

बेळगाव,बागलकोट, विजापूर,चंदगड आदी परिसरातील लोकांना या दिल्ली परिसरातील दिल्लीला जाणाऱ्या प्रवाश्यांना याचा लाभ होणार आहे. बेळगावात संरक्षण खात्याची मुख्य कार्यालये आहेत त्यामुळे दिल्ली विमान सेवेचा विशेषतः जवानांना फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.