Thursday, May 2, 2024

/

..अन् ‘त्या’ कित्येक वर्षे तळ ठोकलेल्या तलाठ्याची झाली बदली

 belgaum

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडे तक्रार गेल्यामुळे बेळगाववासियांसाठी डोकेदुखी ठरलेल्या एका भ्रष्ट तलाठ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

अलिकडे महसूल निरीक्षकांचा कार्यभार सांभाळणाऱ्या एका तलाठ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षाहून अधिक काळ बेळगाव व्हिलेज अकाउंटंट म्हणून काम पाहणाऱ्या या अधिकाऱ्याविरुद्ध असंख्य लोकांच्या तक्रारी होत्या.

राजकीय आशीर्वाद असल्यामुळे गेली अनेक वर्षे बेळगावातच ठाण मांडून असणारा हा तलाठी आपल्या पदाचा गैरफायदा घेताना प्रत्येक सरकारी कामात आपले उखळ पांढरे करून घेत आहे असा त्याचेवर अनेकांनी आरोप केला होता तो एक नंबरचा भ्रष्ट अधिकारी म्हणून तो कुविख्यात होता, असेही सांगितले जाते.

 belgaum

राजकीय वरदहस्त असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी देखील संबंधित तलाठ्याच्या गैरकारभाराकडे कानाडोळा करत होते. मात्र अलीकडे त्याच्याविरुद्ध एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍याकडे तक्रार जाताच, शहानिशा करून संबंधित तलाठ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या भ्रष्ट तलाठ्याच्या बदलीमुळे लुबाडणूक झालेल्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.