Sunday, May 5, 2024

/

पार्किंगच्या नावाने लूट सुरूच : आयुक्तांकडे तक्रार

 belgaum

बेळगाव महापालिकेच्या क्लब रोड येथील वाहन पार्किंगच्या ठिकाणी अवाच्या सव्वा बेकायदा पार्किंग शुल्क आकारणी केली जात असल्याची तक्रार माहिती अजित पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे गेल्या 31 जानेवारी 2022 रोजी केली आहे.

महापालिकेच्या क्लब रोड येथील पार्किंग शुल्क आकारणीचे कंत्राट श्रीमती विनिता विवेकानंद पाटील यांना देण्यात आले आहे. तथापि क्लब रोड येथील पार्किंगच्या ठिकाणी पार्किंगसाठी अवास्तव शुल्क आकारणी केली जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. ठरवून दिलेली पार्किंग शुल्क आकारणी करण्याऐवजी या ठिकाणी ज्यादा शुल्क आकारणी तर केलीच जाते, शिवाय कंत्राटदाराकडून इतर अटी नियमांचे धडधडीत उल्लंघन केले जात असल्याचा आरोप आहे.

या पद्धतीने घालून दिलेल्या अटी नियमांचे उल्लंघन होत असेल तर कंत्राट रद्द करून कंत्राटदाराला दंड ठोठावला जाऊ शकतो. या सर्व बाबी तक्रारदार अजित पाटील यांनी मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.parking fees

 belgaum

तथापि अजित पाटील यांनी तक्रार करून 15 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी आयुक्तांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही किंवा त्यांनी याप्रकरणी कोणती कारवाई केल्याचे संकेत प्राप्त झालेले नाहीत.

तरी नागरिक हक्काची खुलेआम पायमल्ली करण्याच्या या प्रकारा विरुद्ध मनपा आयुक्त कोणती कारवाई करणार याकडे अजित पाटील यांच्यासह त्रस्त वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.

Source:

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.