Monday, May 6, 2024

/

जिव्हारी लागली ‘अटक’ म्हणून केला ‘पण’…’मुक्तता’ होताच घातली ‘चप्पल’

 belgaum

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाचे प्रकरण घडले आणि शिवप्रेमीत संतापाची लाट उसळली.उत्स्फूर्ततेने शिव प्रेमी आपल्या दैवताच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकात जमा झाले,शांतपणे पण धगधगत्या रागाने शिव प्रेमींनी निषेध नोंदवला.
तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात होता त्यांच्या उपस्थितीतच शिव प्रेमींनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून देत आपली मनोगते व्यक्त केली, पण सभा संपल्यानंतर शिवप्रेमी घरी पोचले आणि पोलिसांनी धरपकडीचे सत्र चालू केले. कोणत्याही अनुचित प्रकाराशी या शिवप्रेमींचा काडीचाही संबंध नसताना त्यांची धरपकड झाली. देशद्रोहासारखी कलमे लावून हिंडलगा जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली.

या निष्पाप शिव प्रेमींच्यावर झालेल्या अत्याचाराचा निषेध बेळगावात विविध स्तरातील लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केला त्यातील एक शिवप्रेमी…..मोहन पाटील.मोहन हे ओल्ड गांधी नगर मधील एक लाजाळू व्यक्तिमत्त्व,रमाकांत यांचा निस्सीम भक्त,

आपल्या नेत्याला झालेली अटक याच्या ही बाब खूप जिव्हारी लागली,आणि तक्षणी या निरपराध लोकांची व कट्टर शिवप्रेमी रमाकांत कोंडुस्कर यांची जोवर सुटका होत नाही तोपर्यंत ‘ न घाली पायी व्हाण…हा माझा पण’ जोवर सुटका न होई शिव प्रेमींची न घाली पायी व्हाण… हा माझा पण’ अशी प्रतिज्ञा केली आणि तब्बल 47 दिवस अनवाणी राहून आपला पण पूर्ण केला. ज्यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांना आपल्या कार्यकर्त्यांची ही चित्तर कहाणी समजली तेव्हा ते भारावून गेले. नेत्यांचे बळ हे कार्यकर्त्यांत असते, त्यांच्या याच प्रेरणेने मी अनेक आंदोलनात भाग घेतला आणि घेऊ शकतो हे त्यांनी भरल्या मनाने मनोगत व्यक्त केलं. त्यांनी आपल्या हातांनीच आपल्या कार्यकर्त्याच्या पायी व्हाण चढवल्या.Mohan patil chappal

 belgaum

उपस्थित शिवप्रेमींत एक तेज निर्माण झालं आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला या रोमांचकारी घटनेने रमाकांत दादा कोंडुस्कर हे कार्यकर्ता प्रिय नेता सवंगडी मित्र म्हणून त्यांच्या संघटनेत कसे प्रिय आहेत हे दिसून आहे.

तरुण वर्गात आणि शिव प्रेमी जनतेत रमाकांत कोंडुस्कर हे कमालीचे लोकप्रिय आहेत. त्यांच्या आक्रमक नेतृत्वाची भुरळ समस्त तरुण वर्गाला आहे.तरुणा बरोबर लढणारा लढाऊ नेता अशी बेळगावात त्यांची ख्याती आहे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुणाई रस्त्यावर उतरते हे वास्तव आहे.

कोंडुस्कर केवळ मीडियाचा नेता नसून रस्त्यावर उतरून लढणाऱ्या तगड्या हिंदुत्ववादी संघटनेचा नेता आहे.स्वतःच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभा करणारा कुशल संघटक म्हणून बेळगावात कोंडुस्कर प्रसिद्ध आहेत. तरुणाईला योग्य मार्गावर नेणारा नेता आता या प्रकरणा नंतर अधिकच उजळून निघाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.