मटका खेळणाऱ्या 7 जणांच्या मुसक्या आवळण्यात बेळगावातील कॅम्प पोलीस ठाण्याला यश आले आहे.
डीसीपी डॉ.विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय प्रभाकर धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उपलब्ध माहितीनुसार क्रांती नगरमध्ये धडक देऊन मटका खेळणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्यांकडून २६ हजारांची रोकड आणि ७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेळगाव शहर आणि उपनगरी भागात मटका आणि जुगार यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी पुन्हा एकदा आपली मोहीम गतिमान केली असून ठीक ठिकाणी छापे मारून कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यासंदर्भात पोलिस उपायुक्त विक्रम आपटे यांनी सर्व पोलिसांना सूचना दिल्या असून सर्व ठिकाणची माहिती जमा करून ज्या ज्या ठिकाणी मटका व जुगार अड्डे कार्यरत होतात त्या ठिकाणी छापेमारी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
त्यानुसारच मंगळवारची कारवाई झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.